हिजबुल्लाच्या कमांडरला ठार मारल्याने त्याने केले आक्रमण
जेरुसलेम (इस्रायल) – इराण समर्थक आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा कमांडर हज मोहसीन उपाख्य फुआद शुक्र याला इस्रायलने ठार मारल्यानंतर अवघ्या ४८ घंट्यांत हिजबुल्लाने इस्रायलवर हवाई आक्रमण केले. यांतर्गत लेबनॉनमधून उत्तर इस्रायलवर अनेक रॉकेट डागण्यात आले. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार यांपैकी केवळ ५ रॉकेट इस्रायलच्या सीमेत घुसू शकले. या आक्रमणात आतापर्यंत कोणतीही हानी झालेली नाही.
इस्रायलने १ ऑगस्टच्या सकाळी लेबनॉनमधील चामा येथे हवाई आक्रमण केले होते. यामध्ये सीरियाचे ४ नागरिक ठार झाले, तर अनेक लेबनीज लोकही घायाळ झाले. या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून १ ऑगस्टच्या रात्री उशिरा हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट डागले.