पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश मारटकर यांनी १ ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार्या नैसर्गिक आपत्तींविषयी सांगितलेली भाकिते, तसेच दाते पंचांगाने अतीवृष्टीविषयी वर्तवलेले भाकित खरे ठरले !
१. पुणे येथील ज्योतिषी श्री. सिद्धेश मारटकर यांनी १ ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार्या घटनांविषयी भविष्य वर्तवले आहे. त्यानुसार भारतात मोठी पर्जन्यवृष्टी होणार असून पूर, भूकंप, तसेच भूस्खलन होऊन मोठी हानी होणार आहे, असे त्यांनी भविष्य वर्तवले होते. प्रत्यक्षातही वायनाड (केरळ) येथे भूसख्खलन होऊन २५० हून अधिकांचा मृत्यू झाला, तसेच हिमाचल प्रदेश, देहली आणि उत्तर भारतातील काही भागात मुसळधार पाऊस पडला.
२. यंदाच्या वर्षीच्या दाते पंचांगात दिलेल्या माहितीनुसार ३० आणि ३१ जुलै या दिवशी भारतात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, असे भाकित वर्तवले होते. त्यानुसार ३१ जुलै या दिवशी भारतात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.
ज्योतिषशास्त्राला थोतांड म्हणणारे याविषयी आता काही बोलतील का ? – संपादक