परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ३० वर्षांपूर्वी तिसर्‍या महायुद्धाच्या स्वरूपाविषयी काढलेले उद्गार सत्यात उतरणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधारणपणे वर्ष १९९४-९५ मध्ये एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी ‘तिसरे महायुद्ध कसे असणार ? तिसर्‍या महायुद्धाचा प्रकार कसा असणार ?’, याचे वर्णन करतांना सांगितले, ‘‘त्या वेळी बाँब, क्षेपणास्त्रे इत्यादींची आवश्यकता भासणार नाही. जर दूरभाषची संपर्कयंत्रणा बंद झाली, तर त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार ठप्प होऊन संपूर्ण जनजीवन कोलमडून जाईल.’’

श्री. राजेंद्र सांभारे

१९.७.२०२४ या दिवशी ‘मायक्रोसॉफ्ट’ची संगणक प्रणाली ‘विंडोज्’मध्ये अकस्मात् निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि अधिकोष यांचे काम अनेक घंट्यांसाठी ठप्प झाले होते. त्याचे परिणामही आपण सगळ्यांनी अनुभवले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ३० वर्षांपूर्वीच्या बोलण्याची आठवण झाली. त्यांचे द्रष्टेपण लक्षात येऊन माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि ‘ही आपत्काळाची नांदी आहे’, असे मला जाणवले.’