ब्रह्मोत्सवात वर्षाव गुरुकृपेचा जाहला अत्यानंद ।

११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पाहून आल्यानंतर साधिकेला सुचलेले काव्य येथे दिले आहे.

सौ. दुर्गा कुलकर्णी

पुण्यनगरीमधून निघाल्या मुळा-मुठा, इंद्रायणी, पवना ।
सिद्धनगरीतून निघाल्या भिमा, निरा, सीना ।। १ ।।

कोल्हापुरातून निघाल्या पंचगंगा, कृष्णा, कोयना ।
कर्मभूमीतून निघाल्या वाशिष्ठी, वारणा आणि वेण्णा ।। २ ।।

मराठवाड्यातून निघाल्या नागझरी, भोगावती, तेरणा ।
ब्रह्मोत्सवामध्ये यांना कुणीच जागा देईना ।। ३ ।।

एकजुटीने ठरवले त्यांनी साधकांच्या अंतरंगी जाऊया ।
दिव्य रथ दिसताच श्रीहरीचा हर्षभरीत त्या झाल्या ।। ४ ।।

दर्शन होता श्रीमन्नारायणाचे गलबलून त्या गेल्या ।
साधकांच्या नेत्रांमधूनी भावाश्रू रूपाने वाहू लागल्या ।। ५ ।।

कुणी श्री गुरूंचे चरण प्रक्षाळले, तर कुणी नादब्रह्म आळवले ।
विनायकाच्या श्री मुखातूनी अमृतधारा बरसू लागल्या ।। ६ ।।

जणू चहूबाजूंनी सरिता सागरास भेटाया आल्या ।
आनंदाच्या डोहामधूनी महासागरात विलीन झाल्या ।। ७ ।।

काहींचे दिव्य अनुभव ऐकता नयनी अश्रूधारा वाहिल्या ।
कृतज्ञतेने म्हणती सारे गुरुकृपेचा वर्षावच झाला ।। ८ ।।

– सौ. दुर्गा कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७१ वर्षे), कुमठा नाका, सोलापूर. (११.५.२०२३)