अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
अयोध्या – अलाहाबाद उच्च न्यायालयाने मिल्कीपूर येथील भगावान शिवाचे श्रावण श्रम मंदिर खिहरण याच्या जवळ असलेले दारूचे दुकान हटवण्याची मागणी करणार्या जनहित याचिकेवर २२ जुलै या दिवशी सुनावणी केली. याविषयी उच्च न्यायालयाने अयोध्येच्या जिल्हा उत्पादन शुल्क अधिकार्याकडून उत्तर मागवले आहे. स्वामी कृष्णाचार्य उर्फ काली प्रसाद मिश्रा यांनी ही जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. त्यांच्या वतीने अधिवक्ता हरेंद्र सिंह आणि अधिवक्ता सतीश कुमार शर्मा यांनी युक्तीवाद केला आहे की, मंदिराच्या आवारातच दारूचे दुकान चालवल्याने श्रावण महिन्यात भक्तांना त्रास होईल. श्रावणात भाविकांना भगवान शिवाची पूजा करता यावी म्हणून मंदिराशेजारी असलेले दारूचे दुकान तात्काळ हटवण्यात यावे.
१. याचिकाकर्त्याने उत्पादन शुल्क उपायुक्त, अयोध्या यांच्याकडे याविषयी तक्रार प्रविष्ट केली होती; परंतु त्यांनी दुकान बंद केल्यास उत्पादन शुल्क विभागाची आर्थिक हानी होईल, असे कारण सांगत अर्ज फेटाळला होता. (महसुल मिळवण्यासाठी मंदिराच्या परिसरात दारूचे दुकान चालवणारे आणि त्याचे समर्थन करणार्या प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करा ! – संपादक)
२. संबंधित दारूच्या दुकानाला अनुमती देण्यात सहभागी असलेल्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.
३. न्यायमूर्ती संगीता चंद्रा आणि न्यायमूर्ती श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपिठाने १०० मीटरच्या अनिवार्य मोजमापासाठी अवलंबलेल्या प्रक्रियेविषयी अयोध्येच्या जिल्हा उत्पादन शुल्क अधिकार्याकडून वैयक्तिक प्रतिज्ञापत्र मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जुलैला होणार आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंवर अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ का येते ? सरकाने संबंधितांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! |