पाकप्रेमी भारतीय बँक युनियन !

पाकचे माजी राष्ट्रपती आणि पाक सैन्याचे माजी सैन्यदलप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ

केरळ येथील ‘बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन’ने त्यांच्या राज्य परिषदेत पाकचे माजी राष्ट्रपती आणि पाक सैन्याचे माजी सैन्यदलप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांचा सन्मान करण्याचे ठरवले होते. मुख्य म्हणजे कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सर्व प्रकार त्यांना करायचा होता. भारताचे एकूण ५४३ सैनिक आणि अधिकारी ज्यामध्ये मारले गेले, ते कारगिल युद्ध ज्यांनी घडवले, त्या मुशर्रफ यांचाच सन्मान करण्याचे दु:साहस आणि तेही भारतीय भूमीत होते, असे केवळ भारतातच होऊ शकते. भारतात असे देशद्रोही आणि बँकेसारख्या दायित्वाच्या यंत्रणेत असतात, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. याविरोधात भाजपने निदर्शने केली. ‘युनियन’च्या या कृतीचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर सन्मानाचा कार्यक्रम रहित करण्यात आला. उपरोल्लेखित बँक युनियन ही अतिशय कडवी साम्यवादी म्हणून ओळखली जाते. काँग्रेसचे खासदार के.सी. वेणूगोपाल यांच्यासह ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशन’ आणि ‘ऑल केरला बँक एम्प्लॉयी फेडरेशन’ या कामगार संघटनांचे मुख्य अधिकारी, पदाधिकारीही या राज्य परिषदेला उपस्थित होते. यातून पुन्हा एकदा ‘साम्यवादी हे देशविरोधी असतात’, हा समज खरा ठरला, नव्हे ते एक झाकोळले गेलेले सत्यच आहे, तसेच काँग्रेसही साम्यवाद्यांसह आहे. ती त्यांच्या खांद्याला खांदा लावून भारतविरोधी कृत्ये करण्यात पुढे आहे, हेसुद्धा लक्षात येते.

पाक आणि भारत यांच्यातील शत्रूतेचा जगाला परिचय आहे. सध्याही काश्मीरच्या सीमावर्ती भागात, सैन्याच्या छावण्या या ठिकाणी आतंकवादी आक्रमणे झाली. एक आठवड्याच्या आत सलग झालेल्या आक्रमणांमुळे १ डझन भारतीय सैनिक आणि अधिकारी मृत्यूमुखी पडले. आतंकवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले. ‘कारगिल विजयदिना’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धातील हुतात्मा सैनिक आणि अधिकारी यांच्या परिवारांची भेट घेऊन ‘देश त्यांच्या समवेत आहे, त्यांचे बलीदान देश विसरणार नाही’, ही ग्वाही दिली. त्याचप्रमाणे मोदी यांनी ‘आतंकवाद्यांचे वाईट हेतू कधीही पूर्ण होणार नाहीत’, असे देशवासियांना वचन दिले.

‘कारगिल’चे आक्रमणकर्ते !

कारगिल’चे आक्रमणकर्ते

वर्ष १९९९ मध्ये पाकला एक शांतीचा, प्रेमाचा संदेश देण्याचा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रयत्न केला आणि त्या बदल्यात पाकने सहस्रो आतंकवादी अन् सैन्य भारतीय भूमीत घुसवून अनेक ठिकाणांचा ताबा घेतला होता. भारताला या घुसखोरीची कल्पना विलंबाने आली; मात्र तरीही भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करत प्राणांचे बलीदान दिले आणि घुसखोरांना हुसकावून लावून भारतीय सीमा सुरक्षित केली. या आक्रमणकर्त्यांचे प्रमुख पाकचे जनरल परवेझ मुशर्रफ हेच होते. परवेझ मुशर्रफ यांच्या भारतद्वेषाविषयी काय सांगावे ? भारतात सदिच्छा भेटीसाठी येतांनाही ते त्यांच्या हेलिकॉप्टरला लावलेला भारताचा ध्वज जाणीवपूर्वक उलटा लावून आले. त्यांनी सातत्याने भारतविरोधी आणि भारताचा अपमान करणारी वक्तव्ये केली. भारताची मानहानी करण्याची एकही संधी मुशर्रफ यांनी सोडली नाही. ‘आतंकवाद्यांचे प्रमुख म्हणूनच मुशर्रफ शोभतील’, असे असतांना भारतीय विरांच्या रक्ताने त्यांचे हात माखलेले होते. असे असतांना त्यांचा सन्मान आणि तोही ‘कारगिल विजय दिना’च्या दिवशी ठेवल्यामुळे भारतियांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. अर्थात् भारताऐवजी चीनवर निष्ठा ठेवणार्‍या साम्यवाद्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान या संकल्पना, म्हणजे थोतांड वाटतात. साम्यवाद्यांना हिंदु धर्म, हिंदू यांच्याविषयी घृणा आहेच; मात्र केरळ येथील मुसलमान त्यांना आपले वाटतात. एवढेच नाही, तर पाकप्रेमी आणि पाकिस्तानी आपलेच वाटतात. याचे कारण एकच, ते हिंदू आणि भारत यांचे शत्रू आहेत. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, या न्यायाने साम्यवादी पाकला जवळ करतात. हेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पहायचे झाल्यास साम्यवादी चीन भारताचा शत्रू असलेल्या पाकला जवळ करतो, भारताविरुद्ध कुरघोड्या करायला लावतो आणि स्वत: मात्र सुरक्षित रहातो. यातून साम्यवादी किती भयानक आहेत ? हे लक्षात येते. ते कुठेही असले, तरी आतून एकच असतात आणि राष्ट्र अन् हिंदु धर्म विरोधीच असतात, हेच अधोरेखित होते. हिंदूबहुल भारताला नेस्तनाबूत करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे मुशर्रफ यांचा भारतात सन्मान करण्याच्या नियोजनातून स्पष्ट होते.

साम्यवाद्यांची पकड बसलेल्या केरळमध्ये हिंदु तरुणी लव्ह जिहादची शिकार होत असतांनाही ते लव्ह जिहाद मान्य करत नाहीत. ‘द केरल स्टोरी’ हा लव्ह जिहादवर आधारित चित्रपट केरळ येथे प्रदर्शित करण्यासही साम्यवादी राज्य सरकारने अनुमती दिली नाही. केरळ येथे हिंदूंप्रमाणेच ख्रिस्त्यांनाही काही प्रमाणात असुरक्षित वातावरण आहे. तेथे केवळ साम्यवादी विचारधारा मानणारे आणि मुसलमान दोघेच सुरक्षित आहेत. ‘कट्टर हिंदु म्हणजे केरळचा शत्रू’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तेथील एका महाविद्यालयाच्या वर्गात मुसलमान विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यासाठी शिक्षकांनी अनुमती नाकारली. तेव्हा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच आंदोलन चालू केले अन् शिक्षकांच्या विरोधात घोषणा दिल्या, म्हणजे ‘आम्ही म्हणू तो कायदा’, असेच मुसलमानांना साम्यवाद्यांच्या राजवटीत वाटत आहे.

आतंकवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ !

‘बँक युनियन’च्या दृष्टीने सांगायचे झाल्यास असे भारतविरोधी गट देशात कार्यरत आहेत आणि तेच पुढे-मागे आतंकवाद्यांसाठी ‘स्लीपर सेल’प्रमाणेच (छुप्या गटाप्रमाणेच) काम करतील. पाकने भारतात आतंकवादी आक्रमणे चालू ठेवल्यामुळे भारतीय संघाने पाकमध्ये जाऊन क्रिकेट सामने खेळणे थांबवले आहे. यातून पाकची नाचक्की झाली आहे. तरीही केरळ येथील ‘बँक युनियन’ पाकशी जवळीक कशासाठी वाढवत आहे ? खरेतर अशा ‘बँक युनियन’ची मान्यता रहित करून संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी. शत्रू देशाचा, त्यांच्या माजी सैन्यप्रमुखांचा उदोउदो अन्य कुठलाही देश स्वत:च्या भूमीवर करत नाही. इस्रायलमध्ये इस्रायली नागरिक आणि सैन्य यांची हत्या करणार्‍याला कधीही सन्मानासाठी बोलावत नाहीत. भारतात मात्र असे होते. असे लोक देशासाठी अतिशय हानीकारक आहेत. यदा कदाचित् पाकने भारतावर आक्रमण केल्यास त्याची बाजू घेण्यासाठी, त्याला साहाय्य करण्यासाठी हेच लोक पुढे असतील. तेव्हा हे लोक भारतवासियांसाठीही धोकादायक होऊ शकतात. त्यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अशांना ‘घरभेदी’ म्हटले जाते. ‘उघड शत्रूपेक्षा छुपा शत्रू अधिक धोकादायक असतो’, यानुसार अशांची पाळेमुळे खोदून त्याविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे साम्यवादी, माओवादी हे एकच आहेत आणि ते भारतविरोधी आहेत, हे लक्षात घेऊन त्यांच्यावरही केंद्र सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

कारगिल युद्ध भारतावर लादणारे मुशर्रफ सन्मानपात्र वाटणार्‍या साम्यवाद्यांना कायमचे पाकमध्ये पाठवा !