Joe Biden : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीतून माघार !

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे समर्थन केले. विशेष म्हणजे ४ मासांनंतर ही निवडणूक होणार आहे. बायडेन यांच्या निर्णयावर विरोधी पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. बायडेन यांच्या जागी कोण उमेदवार असणार आहे ?, हे अद्याप घोषित करण्यात आलेले नाही.

१. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली, ते चांगलेच झाले. खरे तर ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्ष होते. ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी योग्य नव्हते. मागच्या निवडणुकीत खोटे बोलून आणि खोटा प्रचार करून ते राष्ट्राध्यक्ष बनले.

२. कमला हॅरिस यांच्यावरही टीका करतांना ट्रम्प म्हणाले की, जर डेमोक्रॅट्स पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली, तर बायडेन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचा पराभव करणे सोपे आहे.