भगवंत सर्वांमध्ये आहे, हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागावे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास. प्रपंचामध्ये व्यवहार होत असतांना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही, तेव्हा तिला ‘सहजसमाधी’, असे म्हणतात. ‘भगवंत चोहीकडे भरलेला आहे’, असे आपण नुसते तोंडाने म्हणतो; पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते. ‘भगवंत माझ्यात आहे, तसाच तो दुसर्‍यातही आहे’, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)