‘मला काही कळत नाही’, असे ज्याला वाटते, तोच गुरु करील. ‘मी केले’, ही जाणीव आड येते; म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे. जो गुरूंच्या आज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरु हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय. गुरुपरता देवधर्मच नाही मानू. ‘व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको’, असे म्हणून कसे चालेल ?
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)