वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी यवतमाळ येथील साधकांना आलेल्या अनुभूती

१. श्री. लहू खामणकर आणि श्री. लोभेश्वर टोंगे

१ अ. गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी आरंभी निश्चित केलेले सभागृह न मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून नवीन सभागृह शोधल्यावर एक उत्तम सभागृह मिळणे : ‘वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी वणी, जिल्हा यवतमाळ येथे मागील वर्षीचेच सभागृह आम्ही निश्चित केले; मात्र गुरुपौर्णिमेपूर्वी १ मास सभागृहाच्या मालकांनी सांगितले, ‘‘३.७.२०२३ या दिवसासाठी आमचे सभागृह आरक्षित झाले आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन सभागृह शोधावे लागेल.’’ हे सांगून त्यांनी क्षमायाचनाही केली. त्यांचे बोलणे ऐकल्यावर आम्ही काही वेळ सुन्न झालो. आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली आणि अन्य एका सभागृहाच्या मालकांना भेटण्यास गेलो. त्यांनी ‘माझ्याकडे असलेल्या २ सभागृहांपैकी जे उपलब्ध असेल, ते देतो’, असे सांगून आम्हाला आश्वस्त केले. आम्हाला त्यांच्याकडून उत्तम सभागृह मिळाले. केवळ श्रीगुरुमाऊलींच्या कृपेमुळेच हे नवीन सभागृह मिळाले. त्यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. सौ. छबू बगमारे

२ अ. गुरुपौर्णिमेचा प्रसार आणि गुरुपूजन या वेळी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवणे : ‘माझ्याकडे रिक्शाद्वारे गुरुपौर्णिमेचा प्रसार करण्याची सेवा होती. त्या वेळी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथात बसल्या आहेत’, असे मला जाणवले. गुरुदेवांनी माझ्याकडून दिवसभर प्रसार करून घेतला आणि मला आनंद दिला. पूजेच्या वेळी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ पूजा करत आहेत’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.’

३. सौ. दुर्गा पारधी

३ अ. गुरुपौर्णिमेपूर्वी पडलेले स्वप्न : ‘गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री ‘पूर्ण सभागृह जिज्ञासूंनी भरले आहे’, असे स्वप्न मला पडले. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रत्यक्षातही सभागृह जिज्ञासूंनी भरलेले होते.

३ आ. आरती चालू असतांना श्रीविष्णुस्वरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे : गुरुपूजन चालू असतांना माझी भावजागृती होऊन सभागृहात सर्वत्र पिवळा प्रकाश दिसत होता. आरती चालू असतांना हातामध्ये कमळपुष्प आणि गदा घेतलेले श्रीविष्णुस्वरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आम्हाला सूक्ष्मातून दर्शन झाले. त्याच वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचेही दर्शन झाले. ‘तिन्ही गुरु साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. सभागृहामध्ये सर्वत्र चंदनाचा सुगंध येत होता. गुरुदेवांच्या चरणांमधून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसत होता.

३ इ. पूजेसाठी आणलेले केळीचे खांब ४ दिवसांनंतरही सुकले नाहीत. त्यावर मला गुरुदेवांचे चरण दिसत होते.

प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेने मला आनंदावस्था अनुभवता आली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १३.७.२०२३)

(क्रमश:)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.