पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन पुन्हा सेवेत रूजू : अंदमानला स्थानांतर

पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – सेवेतून निलंबित केलेले गोव्याचे पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन यांना १ वर्षाने पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले आहे आणि त्यांचे गोव्यातून अंदमान अन् निकोबार बेटावर स्थानांतर करण्यात आले आहे.

ए.कोन हे ‘ए.जी.एम्.यु.टी.’ केडरचे वर्ष २००९चे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. ए. कोन यांना उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये मद्याच्या आहारी जाऊन एका महिलेचे गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव केंद्रीय गृहमंत्रालयाने १६ ऑगस्ट २०२३ या दिवशी सेवेतून निलंबित केले होते. या वेळी ए. कोन यांनी महिलेशी गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. चालू वर्षी जानेवारी मासात केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन यांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ केला होता. यासाठी डॉ. व्ही. केंडावीलाव यांची अन्वेषण अधिकारी म्हणून, तर पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह यांची सादरीकरण अधिकारी या नात्याने नियुक्ती केली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांनी त्यांचा अहवाल केंद्राला सादर केला आहे.

संपादकीय भूमिका 

स्थानांतर केलेला अधिकारी ज्या कारणासाठी निलंबित झाला होता, तो नवीन ठिकाणी जाऊन पुन्हा तेच कृत्य करणार नाही कशावरून ?