देवद, पनवेल येथील श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांच्याकडील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथात झालेले पालट !

१. वाईट स्वप्न पडल्यानंतर २ दिवसांनी ग्रंथावर ओरखडे उमटलेले दिसणे

ग्रंथाचे मूळ मुखपृष्ठ

‘वर्ष २०२२ मध्ये हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येतांना मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्यात्मिक संशोधन’ हा ग्रंथ आध्यात्मिक लाभांसाठी समवेत आणला होता. मला एका रात्री एक स्वप्न पडले. त्यामध्ये ‘माणसांचा एक मोठा समूह माझ्यावर आक्रमण करत आहे’, असे मला दिसले. त्या वेळी ‘गुरुदेव, प.पू. गुरुदेव, परम पूज्य’, असे ओरडत मी त्यांना ढकलून देत आहे’, असे दृश्य मला दिसले. दोन दिवसांनी मला नामजप करतांना या ग्रंथावर प्लास्टिकचे आच्छादन असतांनाही ओरखडे उमटलेले दिसले. मी ते गुरुदेवांना दाखवले. त्यांनी ते पाहिले आणि मला परत दिले. ते म्हणाले, ‘‘नामजपादी उपाय करा.’’ त्यानंतर नियमित हा ‘जीवनदर्शन’ ग्रंथ मी माझ्या उशाशी ठेवून नामजपादी उपाय करत होते.

२. ग्रंथातून चैतन्य आणि प्रकाश प्रकाशित झाल्याचे जाणवणे

श्रीमती स्मिता नवलकर

जून-जुलै २०२२ या मासांपासून मला होणार्‍या पोटाशी संबंधित त्रासांमध्ये वाढ झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा ग्रंथ रुग्णालयातही माझ्या समवेत होता. गेल्या जूनपासून यातून पुष्कळ चैतन्य आणि प्रकाश प्रकाशित होतो. त्याचा रंग हळूहळू फिकट होतो. कधी पिवळसर रंग अधिक जाणवतो, तर कधी पांढरा प्रकाश जाणवतो. गेल्या २ मासांपासून यातील रंगांमध्ये अल्प-अधिक प्रमाणात पालट होत आहेत. इकडे रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी येण्याच्या एक आठवड्यापूर्वी मला त्यात पुष्कळ पालट जाणवत होते आणि आध्यात्मिक लाभही होत होते.’

श्रीमती स्मिता नवलकर यांच्याकडील ग्रंथाचे पालट झालेले मुखपृष्ठ
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या केसांचा रंग निळसर झाला आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चेहर्‍याच्या डाव्या भागावर पिवळसर हिरव्या रंगाची छटा दिसत आहे.

३. गोलाकार केलेल्या भागात पांढरा प्रकाश दिसत आहे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मध्यभागी असलेल्या चित्रावर पांढरा प्रकाश दिसत आहे.

५. अक्षरांच्या काही भागावर पिवळसर छटा आली आहे.

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक