|
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशन’च्या आवाहनानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयातील अधिवक्त्यांचा संप चालू आहे. बार असोसिएशनने न्यायाधिशांचे अधिवक्त्यांशी वागणे, न्यायालयाचे नियम आणि पद्धती यांचे पालन न करणे, यांसह विविध सूत्रांविषयी चिंता व्यक्त केली आहे. बार असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही ठराव संमत करण्यात आले. यात अधिवक्ते यापुढे न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युवर लॉर्डशिप’ म्हणून संबोधणार नाहीत, हाही ठरावा होता.