वरदान हे द्यावे गुरुस्वरूपी ब्रह्मतत्त्वा ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म ।
चरणसेवेसाठीच दिधला हा जन्म ।।
यासाठी प्रत्येक गुण वृद्धींगत व्हावा ।
वरदान हे द्यावे गुरुस्वरूपी ब्रह्मतत्त्वा ।। १ ।।

कु. अवनी छत्रे

हे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म ।
आनंदस्वरूप तुम्हीच मनी मम ।।
दृढ करण्या तोच अंतरी एक ठेवा ।
वरदान द्या हे मजला श्रीहरि केशवा ।। २ ।।

हे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म ।
कृपा तुमचीच माझे प्रत्येक कर्म ।।
याकारणे स्वभावदोष नि अहं यांचा लय करावा ।
वरदान मज हे द्या हे भगवान शिवा ।। ३ ।।

हे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म ।
माया-मोक्षाचे एक तुम्हीच मर्म ।।
सत्वरि आता घोर स्वप्नातूनी उठवा ।
साक्षात् शक्तिधारी हे गुरुरूपे त्रिदेवा ।। ४ ।।

सच्चिदानंद परब्रह्मा हे प्रिय गुरुदेवा ।
शिष्य स्वरूपात माझा स्वीकार व्हावा ।।
नुरे इच्छा आणिक आता यावाचून काही ।
अंतिम असा या चरणी विसावा मिळावा ।। ५ ।।

– कु. अवनि छत्रे, नागेशी, फोंडा, गोवा. (२८.२.२०२३)