Zelensky On Modi-Putin Meet : (म्‍हणे) ‘घोर निराशा आणि शांततेच्‍या प्रयत्नांना एक विनाशकारी धक्‍का !’

मोदी आणि पुतिन यांच्‍या भेटीवर झेलेंस्‍की यांनी व्‍यक्‍त केले दुःख

मोदी , पुतिन आणि झेलेंस्‍की (डावीकडील)

कीव (युक्रेन) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्‍या रशियाच्‍या दौर्‍यावर गेले होते. त्‍यांनी ८ जुलै या दिवशी राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. मोदी आणि पुतिन यांनी गळाभेट घेतली. यावर युक्रेनचे राष्‍ट्रपती झेलेंस्‍की यांनी ‘एक्‍स’वर पोस्‍ट करून दुःख व्‍यक्‍त केले आहे.

झेलेंस्‍की यांनी म्‍हटले की, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्‍या नेत्‍याला (पंतप्रधान मोदी यांना) मॉस्‍कोमध्‍ये जगातील सर्वांत भयंकर गुन्‍हेगाराला (पुतिन यांना) आलिंगन देतांना पहाणे ही घोर निराशा करणारी आणि शांततेच्‍या प्रयत्नांना एक विनाशकारी धक्‍का देणारी गोष्‍ट आहे.’

संपादकीय भूमिका

काही वर्षांपूर्वी युक्रेनने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये काश्‍मीरच्‍या सूत्रावरून भारताच्‍या विरोधात मतदान केले होते. तोही भारतियांसाठी विनाशकारी धक्‍का होता, हे झेलेंस्‍की यांनी लक्षात घ्‍यावे !