कु. श्लोक योगेश ठाकूर याचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश !

उरण तालुक्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण

कु. श्लोक योगेश ठाकूर

उरण – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कु. श्लोक योगेश ठाकूर (५३ टक्के आध्यात्मिक पातळी) हा उरण तालुक्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला शिष्यवृत्तीही मिळाली आहे. तो नियमितपणे नामजप लिहितो, तसेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार प्रासंगिक सेवा करतो. तो फलकलेखनही नियमित करतो. त्याने त्याच्या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले आहे.