S Jaishankar : परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

सीमा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर दोघांची सहमती

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

अस्ताना (कझाकिस्तान) – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची येथे भेट झाली. डॉ. जयशंकर यांनी वांग यांना सांगितले की, वास्तविक नियंत्रण रेषेचा (एल्.ए.सी.चा) आदर करणे आणि सीमावर्ती भागांत शांतता सुनिश्‍चित करणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील संबंध हे परस्पर आदर, स्वारस्य आणि संवेदनशीलता यांवर आधारित असले पाहिजेत.

डॉ. जयशंकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, आज सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. सीमाभागातील उर्वरित प्रश्‍न लवकर सोडवण्याविषयी चर्चा केली. राजनैतिक आणि सैनिकी माध्यमांतून या दिशेने दुप्पट प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.

संपादकीय भूमिका

चीनने कितीही सहमती दर्शवली, तर त्याच्यावर कुणी विश्‍वास ठेवू शकत नाही, हे भारतालाही आता लक्षात आलेले आहे !