China Seizes Fishing Boat : चिनी नौदलाने पकडली तैवानची मासेमारी नौका !

प्रातिनिधिक छायाचित्र

टायपे (तैवान) – चिनी नौदलाच्या तटरक्षकदलाने नुकतीच तैवानची मासेमारी नौका कह्यात घेतली. तैवानच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, ‘तचिनमन ८८’ ही नौका चिनी नौदलाच्या दोन जहाजांनी किनमेन द्वीपसमूहाजवळ रोखली. हे ठिकाण चीनच्या किनारपट्टीपासून थोड्या अंतरावर आहे; परंतु ते तैवानच्या नियंत्रणात आहे. तैवानने ‘तचिनमन ८८’च्या सुरक्षेसाठी ३ नौका पाठवल्या होत्या; परंतु चिनी जहाजांनी त्यांना थांबवले. त्यानंतर संघर्ष आणखी वाढू नये; म्हणून तैवानच्या नौदलाने माघार घेतली.

नौका तात्काळ मुक्त करण्याची तैवानची मागणी !

तैवानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनच्या तटरक्षकदलाला  दोन्ही देशांमधील संबंध बिघडवायचे नसतील, तर ‘तचिनमन ८८’ ही नौका आणि त्यातील कर्मचारी यांना लवकरात लवकर सोडले पाहिजे.