पिंपरी महापालिकेतील महिला लिपिक निलंबित !

पिंपरी – महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना (अनुमती) विभागातील महिला लिपिक अश्वमेघ वडागळे यांनी उपायुक्त संदीप खोत यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून ४ नवीन उद्योग परवाने दिले. त्यामुळे त्यांना निलंबित केले आहे. मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कारण त्यांनी दिले होते.

संपादकीय भूमिका

प्रत्येक सरकारी खात्यातील नीतीमत्ता रसातळाला चालल्याचे हे द्योतक आहे. महिलांनीही भ्रष्टाचारात सहभागी होणे अधिक दुर्दैवी !