Majority Become Minority : ‘धर्मांतर होत राहिल्यास भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे परखड मत

  • धर्मांतर करणार्‍या धार्मिक मेळाव्यांवर बंदी घालण्याचा आदेश

  • हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्याचा जामीन अर्ज फेटाळला

लक्ष्मणपुरी – अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर टीका केली. न्यायालयाने म्हटले, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिस्ती बनवले जात आहे. असेच धर्मांतर होत राहिले, तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल.’’ न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी धर्मांतर करणार्‍या धार्मिक मेळाव्यांवर तात्काळ बंदी घालण्याचाही आदेश या वेळी दिला. ‘अशा घटना राज्यघटनेच्या विरोधात आहेत’, असेही ते म्हणाले. कैलास नावाच्या एका ख्रिस्त्याने उत्तरप्रदेशातील एका हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केले होते. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी चालू आहे. ‘कैलास याच्यावरील आरोप गंभीर आहेत. अशा स्थितीत त्याची जामिनावर सुटका होऊ शकत नाही’, असे सांगत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.

न्यायालयाची धर्मांतराविषयी महत्त्वपूर्ण टिप्पण्या

१. घटनेचे कलम २५ धर्मप्रचाराला अनुमती देते; परंतु धर्मांतराला नाही.

२. उत्तरप्रदेशात धार्मिक कार्यक्रमांत निरपराध गरिबांची दिशाभूल करून त्यांना ख्रिस्ती बनवल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण ?

उत्तरप्रदेशातील हमीरपूर येथील रामकली प्रजापती यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यात म्हटले होते, ‘‘माझा भाऊ मानसिक आजारी होता. कैलास नावाचा युवक त्याला एका आठवड्यासाठी देहलीला घेऊन गेला. कैलास म्हणाला होता की, तुमच्या भावावर उपचार करून त्याला गावी परत आणतो; पण आठवडा झाला, तरी तो परतला नाही. त्यानंतर बर्‍याच दिवसांनी कैलास माझ्या भावाला घेऊन परत आला. मग तो माझ्या भावासह गावातील अनेक लोकांना घेऊन देहलीला परत गेला. तिथल्या एका कार्यक्रमात सगळ्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याबदल्यात त्यांना पैसे देण्यात आले.’’

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये वाढ !

उत्तरप्रदेशमध्ये मूकबधीर मुलांचे धर्मांतर करणार्‍या मौलानाच्या विरोधात लावला रासुका कायदा

वर्षांपूर्वी मूकबधिर मुलांच्या धर्मांतराचे प्रकरण समोर आले होते. आतंकवादविरोधी पथकाने या प्रकरणी मौलाना (इस्लामचा अभ्यासक) उमर आणि जहांगीर याला अटक केली होती. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर आदेश दिले होते. त्यांनी म्हटले हातेे की, जो कुणी या कामात सहभागी आहे, त्या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ (रासुका) आणि गुंडगिरी कायदा यांतर्गत गुन्हे नोंदवावेत. त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात यावी. प्रत्येक पैलू तपशीलवार तपासावेत.

उत्तरप्रदेशात एकाच वेळी ४०० जणांनी केली होती ख्रिस्त्यांच्या विरोधात तक्रार ‘

२८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये धर्मांतराचे एक मोठे प्रकरण समोर आले होते. मंगतापुरम कॉलनीतील अनुमाने ४०० लोक पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोचले. या सर्वांनी ‘आम्हाला ख्रिस्ती बनवण्यास भाग पाडले जात आहे’, अशी तक्रार केली होती. ‘कोरोना महामारीच्या काळात लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळात काही ख्रिस्त्यांनी कॉलनीतील रहिवाशांना साहाय्य केले होते. आता ते धर्मांतरासाठी दबाव आणत आहेत. त्यांना संकुलातील हिंदूंना मंदिरात जाण्यास आणि पूजा करण्यास मनाई केली आहे. अनेक घरांमधून हिंदूंच्या देवतांची चित्रे काढून टाकण्यात आली आहेेत’, असे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.