वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘आतंकवादामुळे पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, असा भारताचा नेहमीच आग्रह आहे. याकडे पहाता भारत आणि पाकिस्तान यांच्याशी अमेरिकेचे संबंध कुठल्या स्तरावर आहेत ?’, असा प्रश्न अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘जगातील कोणताही देश कुठेही आतंकवादाचा निषेध करेल, असा आम्हाला विश्वास आहे. शेजार्यांशी अधिक सकारात्मक संबंध निर्माण करणार्या प्रत्येक देशाचे अमेरिका स्वागत करते; पण शेवटी ते भारत आणि पाकिस्तान यांच्यावर अवलंबून आहे की, ते आतंकवादाकडे कसे पहातात ?’
पटेल पुढे म्हणाले की, भारत हा असा देश आहे, ज्याच्यासमवेत आम्ही अनेक क्षेत्रांत आमचे संबंध अधिक दृढ करत आहोत. विशेषत: हे संबंध आमचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याशी संबंधित आहे.
संपादकीय भूमिकाजगातील काही देश आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेले आहेत आणि ते वरून आतंकवादाचा निषेध करण्याचे नाटक करतात. अशांंना आता जगाने उघडे पाडण्याची आवश्यकता आहे, असे अमेरिका कधी सांगेल का ? |