अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन !
जळगाव – येथे झालेल्या चार दिवसीय अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बिर्याणी किंवा मटण यांचे हॉटेल, तसेच ट्रॅक्टरचे दुकान यांच्यावर ‘छत्रपती’ लिहिण्यावर तातडीने बंदी आणावी, याविषयीचा ठराव डॉ. राहुल सदानशिव यांनी मांडला. त्याला एकमताने संमती देण्यात आली.
या वेळी संमत झालेले अन्य ठराव !
१. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे प्रत्येक विद्यापिठात जतन व्हावे.
२. त्यांच्या संदर्भातील अधिकतर साहित्य फ्रेंच, इंग्रजी, फारसी, मोडी या भाषांमध्ये असल्याने सोप्या अभ्यासाची केंद्र चालू करावीत. त्यातून संदर्भ मिळू शकतील.
३. शिवरायांचा अवास्तव इतिहास मांडणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलावे.
संपादकीय भूमिकाअसा ठराव सर्वच ठिकाणी संमत करायला हवा ! |