Jabalpur Hindu Protest : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे गोवंशांचे अवशेष सापडल्याने हिंदु संघटनांकडून आंदोलन !

हिंदु संघटनांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

जबलपूर (मध्यप्रदेश) – जबलपूर जिल्ह्यातील कटंगी परिसरातील तुल्ला बाबा टेकडीवर ५७ हून अधिक प्राण्यांचे अवशेष सापडले. हे अवशेष गोवंशांचे असल्याचे हिंदूंनी सांगितले. या प्रकरणी २८ जून या दिवशी हिंदु संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी येथील जबलपूर-दमोह रस्ता ४ घंटे रोखून धरला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपक कुमार सक्सेना आणि पोलीस अधीक्षक आदित्य प्रताप सिंह घटनास्थळी पोचले. दोघा अधिकार्‍यांनी ‘आरोपींवर कठोर कारवाई करू’, असे आश्‍वासन देऊन वाहतूक सुरळीत केली.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आणि राज्यात गोहत्या बंदी असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !