ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचे जाळे उद्ध्वस्त !

ठाणे – येथे लैंगिक अत्याचाराचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. थाई महिलांच्या साथीने हा प्रकार चालू होता. या प्रकरणी बागदी अब्दुल्ला (वय ४२ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो थाई महिलांना बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून देण्याच्या बदल्यात महिलांकडून शरीरविक्रीचा धंदा करून घेत असे.