वाळू व्यवसायातून गुन्हेगारी वाढल्याची महसूलमंत्र्यांची स्वीकृती

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – वाळू व्‍यवसायातून गुन्‍हेगारीकरण वाढले. ते थांबवण्‍याचा शासनाचा प्रयत्न आहे. महसूल अधिकारी, कर्मचारी यांवर होणार्‍या आक्रमणाविषयी जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे सर्व अधिकार देण्‍यात आले आहेत, असे महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी २८ जून या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात सांगितले. आमदार संजय गायकवाड यांनी याविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.