Chinese Telecom Equipment : काश्मीरमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांकडे सापडली चीनची दूरसंचार उपकरणे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी जिहादी आतंकवाद्यांकडून चिनी बनवटीची दूरसंचार उपकरणे जप्त केली. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील आतंकवाद्यांनी वापरलेले भ्रमणभाष सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहेत.

या आतंकवाद्यांना पाकिस्तानी सरकारकडून प्रशिक्षण, शस्त्रे आणि दारूगोळा मिळत होते. हे भ्रमणभाष केवळ चिनी आस्थापनांनी पाकिस्तानी सैन्यासाठी निर्माण केले आहेत.