Bengal Madrasas : बंगालमध्‍ये मदरशातील शिक्षणासाठी ५ सहस्र ५३० कोटी रुपयांची तरतूद

बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – बंगाल राज्‍याचा अर्थसंकल्‍प फेब्रुवारी २०२४ मध्‍ये सादर करण्‍यात आला होता. यात राज्‍यातील विविध योजना, खाती आणि प्रकल्‍प यांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्‍यात आली होती. त्‍यात अल्‍पसंख्‍य आणि मदरसे यांच्‍यासाठी ५ सहस्र ५३०० कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली आहे. अन्‍य योजनांच्‍या तुलनेत ही रक्‍कम पुष्‍कळ मोठी आहे. सध्‍या सामाजिक माध्‍यमांतून ही माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे.

सामाजिक माध्‍यमांतून यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत. ‘एक्‍स’वर एका व्‍यक्‍तीने यावर म्‍हटले की, ममता बॅनर्जी या अत्‍यंत प्रामाणिक मुख्‍यमंत्री आहेत. हिंदूंची मते घेऊन सत्तेत येणारे मुसलमानांचे लांगूलचालन करतात, तसे ममता बॅनर्जी करत नाहीत.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्‍या एकगठ्ठा मतांवर निवडून सत्तेत येणार्‍या ममता बॅनर्जी मुसलमानांसाठी हवे ते करतात; मात्र हिंदूंच्‍या मतांवर निवडून येणारे हिंदूंसाठी काही न करता मुसलमानांना खुश करण्‍याचाच प्रयत्न करतात !