दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचून साधकाचे झालेले चिंतन !

‘५.६.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ यांमध्ये ‘एखाद्या भक्ताला देवाचे दर्शन झाल्यावर त्याला मिळणारा आनंद हा निवडणुकीच्या निकालाच्या आनंदाच्या कैक पटींनी अधिक असतो’, असे लिहिले होते. हे वाचल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. क्षणिक सुख केव्हाही नष्ट होऊ शकते !

श्री. शंकर नरुटे

जनतेने निवडलेला राजा आणि जनतेवर लादलेला राजा यापेक्षा भगवंताचे राज्य म्हणजे भगवंतच सर्वस्व आहे. त्याच्या इच्छेने जे होईल, ते आनंदाने स्वीकारल्याने मन सतत आनंदी रहाते. आताच्या राजकारणात एकमेकांकडून अपेक्षा, चढाओढी आणि अहं आणि स्वभावदोषांचे बोलणे, म्हणजेच प्रतिक्रिया यांमुळे समाजावर होणारे परिणाम या सगळ्यांमध्ये भगवंताचे अस्तित्व नसल्याने आनंद मिळत नाही. त्यामध्ये क्षणिक सुख असते. ते कधीही निघून जाऊ शकते.

२. देव भेटणार्‍यांना नेहमी आनंद मिळणे

निवडणुकीत विजय झालेले उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांना मतदान करणारे यांना आनंद होतो; पण तो काही काळ असतो. ज्याला देव भेटतो, त्याच्या जीवनात नेहमीच आनंद असतो.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले भेटल्यामुळे साधकांना सतत आनंद मिळणे

सनातनच्या साधकांना प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) रूपात भगवंत भेटला आहे. त्यामुळे प.पू. डॉक्टरांचे नाव काढले, तरी साधकांना आनंद होऊन त्यांची भावजागृती होते. तसेच साधकांना कृतज्ञता वाटते; म्हणून सच्चिदानंद सर्वांना सतत आनंद देणारे भगवंत आहेत; म्हणून आपल्याला ‘भगवंताचे राज्य’, म्हणजेच ‘ईश्वरी राज्य (हिंदु राष्ट्र)’ हवे आहे.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.६.२०२४)