Mecca Heatstroke : सौदी अरेबियामध्ये ९२२ हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू

मृतांमध्ये ६८ भारतीय

रियाध (सौदी अरेबिया) – मक्का येथे हज यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत येथे ९२२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यांतील ६०० यात्रेकरू इजिप्तचे आहेत, तर ६८ जण भारतीय आहे.

याव्यतिरिक्त १ सहस्र ४०० जण बेपत्ता असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मक्का येथे १७ जून या दिवशी तापमान ५१.८ अंश सेल्सिअस, तर १८ जून या दिवशी ४७ अंश सेल्सिअस होते.