BJP Leader’s Husband Stabbed : चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपच्या महिला नेत्याच्या पतीवर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक आक्रमण

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीवर प्राणघातक आक्रमण (वर्तुळात)

चेन्नई (तमिळनाडू) – येथे भाजपच्या महिला नेत्या नादिया यांचे पती श्रीनिवासन् यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. श्रीनिवासन् यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे आक्रमण वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. श्रीनिवासन् यांचा अनेक वर्षांपूर्वी एका हत्येच्या घटनेत सहभाग असल्यावरून हे आक्रमण झाल्याचे म्हटले जात आहे.

आक्रमण करणार्‍यांनी श्रीनिवासन् यांचा पाठलाग केला आणि नंतर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले. ‘श्रीनिवासन् यांचा मृत्यू झाला’, असे समजून ते पळून गेले. ही घटना अण्णानगरमध्ये घडली. या वेळी घटनास्थळावर उपस्थित काही लोकांनी या घटनेचे चित्रीकरण केले आणि त्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. या व्हिडिओंच्या आधारेच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. राजेश, प्रशांत, प्रकाश, श्रीनिवासन्, सरवणन आणि राजेश अशी आरोपींची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

सत्ताधारी द्रमुकच्या (द्रविड प्रगती संघाच्या) राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !