उज्‍ज्‍वल निकम पुन्‍हा विशेष सरकारी अधिवक्‍ता !

उज्‍ज्‍वल निकम

सांगली, १६ जून (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-मध्‍य मतदारसंघात उमेदवारी आवेदन प्रविष्‍ट केल्‍यानंतर विशेष सरकारी अधिवक्‍ता उज्‍ज्‍वल निकम यांनी पदाचे त्‍यागपत्र दिले होेते. त्‍यांचा निवडणुकीत पराभव झाल्‍याने ते आता पुन्‍हा न्‍याय विभागाच्‍या कक्षेत भरती झाले आहेत. राज्‍यशासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्‍या कलम २४ (८) नुसार त्‍यांची ‘विशेष सरकारी अधिवक्‍ता’ म्‍हणून फेरनियुक्‍ती केली आहे. त्‍यामुळे राज्‍यभरात विविध जिल्‍ह्यांतील २९ प्रकरणांत ते पुन्‍हा काम पहातील.