‘पर्यावरणाची हानी होऊ नये’, यासाठी घरामध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवू न देणारा आणि सात्त्विक वृत्तीचा पुणे येथील कु. पियुष मकरंद लोखंडे (वय १७ वर्षे) !

उद्या ज्येष्ठ शुक्ल दशमी (१६.६.२०२४) या दिवशी कु. पियुष लोखंडे याचा १७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. पियुष लोखंडे याला १७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

 

कु. पियुष मकरंद लोखंडे

‘कु. पियुषच्या जन्माच्या आधी मला साधनेविषयी फारसे ज्ञान नव्हते; पण मला लहानपणापासून देवाची आवड होती. मी नेहमी श्री शिवलीलामृत ग्रंथ वाचत असे. मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचनेही आवडायची. ‘तशीच देवाची ओढ पियुषमध्ये आली आहे’, असे मला वाटते.

१. लहानपणी देवघरातील उदबत्ती आणि दिवा यांचे आकर्षण असणे

सौ. प्रीती लोखंडे

कु. पियुष ३ – ४ मासांचा असतांना देवाजवळ दिवा लावलेला बघून रडायचा. त्याला घेऊन देवाजवळ उभे राहिल्यावरच तो शांत व्हायचा. पियुषला लहानपणी देवघरातील उदबत्ती आणि दिवा यांचे पुष्कळ आकर्षण होते. तो एकटक उदबत्तीकडे बघत देवघरासमोर पुष्कळ वेळ बसून रहायचा. तो उदबत्तीकडे पहातांना पापणीही मिटत नसे.

२. देवाची ओढ

अ. कु. पियुष लहान असतांना खेळणी विकत घेण्यासाठी हट्ट न करता देवतांचे पदक (लॉकेट) घ्यायला लावत असे.

आ. तो अगदी लहान असल्यापासून गळ्यात तुळशीची माळ घालतो.

इ. तो लहान असल्यापासून प्रतिदिन ‘शुभंकरोती..’ म्हणतो. तो सकाळी शाळेत जातांना आणि संध्याकाळी घरातील सर्वांना नमस्कार करतो.

ई. तो लहान असल्यापासून ‘श्रीरामरक्षास्तोत्र’, ‘अथर्वशीर्ष’, ‘हनुमान चालीसा’, ‘संकटनाशन स्तोत्र’ ही सर्व स्तोत्रे  म्हणतो.

उ. पियुषला लहानपणापासून देवपूजा पुष्कळ आवडते. पूजा करतांना तो सर्वांगाला भस्म लावायचा.

ऊ. लहानपणी पियुष नेहमी म्हणायचा, ‘मला मोरया गोसावी मंदिरात (पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी महाराज यांचे मंदिर) पुजारी व्हायचे आहे.’ त्याला त्याचे कारण विचारल्यावर तो म्हणायचा, ‘‘मला गणपतीबाप्पाची पूजा करायला आवडते.’’


‘झाडांची हानी होऊ नये’, यासाठी जागृत असणारा कु. पियुष !

पू. (सौ.) मनीषा पाठक

‘कु. पियुष सात्त्विक आहे. तो मनापासून साधनेचे प्रयत्न करतो. त्याने त्याच्या आई-बाबांना घरी वातानुकूलन यंत्रणा लावू दिली नाही. तो म्हणतो, ‘‘एका वातानुकूलन यंत्रणेमुळे १० झाडांची हानी होते.’’ हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे.’

– पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत), पुणे. (१०.६.२०२४)


३. वाचनाची आवड

पियुषला लहानपणापासून वाचनाची पुष्कळ आवड आहे. तो रामायण आणि महाभारत हे ग्रंथ पुष्कळ वेळा वाचतो. त्याने विविध पुस्तकांचा संग्रहही केला आहे.

४. तो चित्रेही उत्तम काढतो.

५. अध्ययनाची रुची असल्याने पियुषची प्रगती उत्तम प्रकारे होत आहे.

६. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्याने प्राविण्य मिळवले आहे.

७. पर्यावरणाविषयी जागृत असणे

त्याला त्याच्या वाढदिवसाला तुळस किंवा अन्य झाडे लावायला आवडतात. एकदा आमच्या घरासमोरील झाड ‘सीसीटीव्ही’ लावण्यासाठी तोडल्यावर पियुष पुष्कळ रडला होता. ‘पर्यावरणाची हानी होऊ नये’, यासाठी पियुषने आम्हाला घरामध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवू दिली नाही.

८. अन्य गुण

त्याला मोठ्या आवाजात बोललेले आवडत नाही. पियुषमध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा, जेवतांना आवाज न करणे, अन्न वाया न घालवणे, वस्तू जागेवर ठेवणे इत्यादी अनेक गुण आहेत.

९. स्वभावदोष

अती आत्मविश्वास’

– सौ. प्रीती मकरंद लोखंडे (कु. पियुषची आई) (५.६.२०२४), पुणे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक