वेळेचे पालन करणारे आणि तळमळीने सेवा करणारे फोंडा, गोवा येथील श्री. सुरेंद्र आठवले (वय ६४ वर्षे) !

‘जेष्ठ शुक्ल सप्तमी (१३.६.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सुरेंद्र आणि सौ. सुप्रिया आठवले यांच्या लग्नाचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. सुप्रिया आठवले यांना श्री. सुरेंद्र यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. सुरेंद्र आणि सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले यांना लग्नाच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

 

श्री. सुरेंद्र आठवले

१. वेळेचे काटेकोरपणे पालन करणे

‘पूर्वी श्री. सुरेंद्र पुणे येथे एका आस्थापनात नोकरी करत होते. तेव्हा ते आस्थापनात वेळेतच जात असत. त्यांचे अधिकोषात काम असेल, तर ते अधिकोष उघडण्यापूर्वी ५ मिनिटे आधी तेथे जातात. त्यामुळे त्यांची कामे वेळेत पूर्ण होतात.

२. समंजस

सौ. सुप्रिया आठवले

आम्हाला कुठे बाहेर जायचे असेल आणि त्या ठरलेल्या वेळेत माझे आवरले नाही, तर पूर्वी त्यांची चिडचिड होत असे. आता ते मला समजून घेतात. त्यांचे आवरून झाल्यावर ते शांतपणे बसून नामजप करतात.

३. प्रेभभाव

मी रुग्णाईत असल्यास ते मला म्हणतात, ‘‘तू विश्रांती घे. मी घरातील सर्व पहातो.’’ ते मला आश्रमातून महाप्रसादाचा डबा आणून देतात. ते दुपारी भ्रमणभाष करून माझी विचारपूस करतात.

४. सेवेची तळमळ

एकदा आम्ही पुणे येथून रात्रीचा प्रवास करून गोवा येथे सकाळी ७ वाजता पोचलो. तेव्हा ते सकाळी सर्व आवरून १० वाजता आश्रमात सेवेसाठी गेले. यातून त्यांच्यामधील सेवेची तळमळ लक्षात येते.

गुरुमाऊली, ‘आपणच श्री. सुरेंद्र यांच्याकडून आपल्याला अपेक्षित अशी सेवा आणि साधना करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले, फोंडा, गोवा. (४.६.२०२४)