PM Modi Cabinet 2024 : केंद्रीय मंत्रीमंडळात ३० मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र पदभार

अद्याप खातेवाटप नाही !

नवी देहली – नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या वेळी ७१ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात ३० जणांना कॅबिनेट मंत्री, तर उर्वरितांपपैकी ३६ जणांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. ३० मंत्र्यांपैकी २५ जण भाजपचेच आहेत. उर्वरित ५ जणांमध्ये जनता दल (संयुक्त), जनता दल (धर्मनिरपेक्ष), लोक जनशक्ती पक्ष, हिंदुस्थान अवामी मोर्चा आणि तेलुगू देसम् या पक्षांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यमंत्र्यांमध्ये भाजपचे ३२ जण आहेत, उर्वरित ४ मध्ये भारिपला १, जनता दल(संयुक्त) १ आणि तेलुगू देसम् २ असे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यमंत्री स्वतंत्र पदभारसाठी अवघ्या ५ खासदारांनी शपथ घेतली. त्यातही भाजपचे ३ खासदार, शिवसेना (शिंदे) १, तर राष्ट्रीय लोक दल यांना १ असे पद देण्यात आले आहे. मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खातेवाटप अद्याप करण्यात आलेले नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला २ कॅबिनेट,१ स्वतंत्र पदभार, ३ राज्यमंत्री अशी पदे मिळाली आहेत.