जन्मदिवस साजरा करण्यासंदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण आणि त्यांच्या अन् सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या विचारांतील साम्य !

वर्ष २०१५ मध्ये महर्षींच्या आज्ञेनुसार साजर्‍या केलेल्या प्रथम जन्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर करण्यात आलेली पुष्पवृष्टी

श्री गुरुचरणी कृतज्ञताभावाने वाहिलेली भावसुमनांजली

मी न्यून पडते तुमच्या पावन चरणांची चरणधूळ बनण्यासाठी,
मी न्यून पडते सतत भावावस्थेत राहून तुम्हाला अनुभवण्यासाठी ।

मी न्यून पडते तुम्ही सांगितलेले साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी,
मी न्यून पडते ईश्वरेच्छा (तुमची इच्छा) जाणून घेण्यासाठी ।
मी न्यून पडते तुमच्या कृपेची व्यापकता समजून घेण्यासाठी ।
शब्द अपुरे पडतात, श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ।।

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०२४)


श्री. निषाद देशमुख

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा

‘माझी जन्मतिथी ज्येष्ठ शुक्ल षष्ठी आहे. तो दिवस भौतिकदृष्ट्या सामान्य दिवस आहे. काही जणांचा जन्म विशेष तिथीला झाला असल्यामुळे मलाही वाटत होते, ‘माझा जन्म विशेष तिथीला व्हायला हवा होता.’

याविषयी मी वर्ष २०१० मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझा वाढदिवस सामान्य तिथीला येतो आणि तुझाही ! आपण आपल्या आध्यात्मिक कर्तृत्वाने आपला वाढदिवस विशेष बनवायचा असतो. माझाही जन्मदिवस अनेक जणांना ठाऊक नाही; मात्र येणार्‍या काळात माझा वाढदिवस सगळे साधक विशेष उत्सवाच्या रूपाने साजरा करतील. माझा जन्मदिन त्यांच्या कायम स्मरणात राहील आणि ते माझ्या वाढदिवसाची चातकाप्रमाणे वाट पहातील.’’ यावरून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतःच्या वाढदिवसाविषयी वर्ष २०१० मध्ये काढलेले उद्गार किती अचूक आहेत !’, हे आपल्याला वर्ष २०१५ पासून चालू असलेले त्यांचे विशेष जन्मोत्सव आणि वर्ष २०२३ मध्ये झालेला त्यांचा भव्य ‘ब्रह्मोत्सव’ यांवरून अनुभवण्यास मिळत आहे. ही सर्व त्यांचीच कृपा आहे.

२. ‘विशेष तिथीला जन्म झालेले लोक आणि कर्तृत्वाने विशेष असणारे लोक’ यांविषयी श्री. निषाद देशमुख यांनी सांगणे

१९.५.२०२४ या दिवशी सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांचा वाढदिवस होता. तेव्हा आम्ही काही साधक एकत्र जमलो होतो. तेथे उपस्थित असणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे) म्हणाले, ‘‘श्री. राम होनप यांचा वाढदिवस रामनवमीनंतर लगेच येतो आणि माझा वाढदिवस हनुमान जयंतीच्या दिवशी येतो. आमचे वाढदिवस विशेष तिथीला असतात; परंतु कु. मधुरा भोसले यांचा वाढदिवस विशेष तिथीला येत नाही. काही जण त्यांचा वाढदिवस विशेष तिथीला येत असल्यामुळे विशेष असतात, तर काही जणांची कर्तृत्वरूपी साधना विशेष असल्यामुळे ते विशेष असतात. मी आणि रामदादा पहिल्या गटात मोडतो, तर मधुराताई दुसर्‍या गटात मोडतात.’’ वर्ष २०१० मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सांगितलेल्या वरील सूत्राविषयी श्री. निषाद देशमुख यांना काहीही ठाऊक नसतांना त्यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले, ‘‘मला हे सूत्र देवाच्या कृपेने आता अकस्मात् स्फुरले आणि तुम्हाला सांगितले.’’

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे श्री. निषाद देशमुख यांना ठाऊक नसतांनाही त्यांनीही तशीच सूत्रे सांगणे

एका साधिकेने विचारले, ‘‘विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्यामध्ये काय भेद आहे ?’’ तेव्हा श्री. निषाद यांनी सांगितले, ‘‘जेव्हा आपले मन विश्वमनाशी जोडले जाते, तेव्हा आपल्याला एखाद्या घटनेचे सूक्ष्मातून अवलोकन करता येते, म्हणजे सूक्ष्मातून पहाता येते. जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेच्या मागील कार्यकारणभाव लक्षात येतो, तेव्हा आपले मन विश्वबुद्धीशी जोडलेले असते.’’ तेव्हा वर्ष २०१० मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सांगितलेल्या सूत्राचे स्मरण झाले. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘सूक्ष्म परीक्षण हे विश्वमनाशी जोडल्यामुळे होते, तर सूक्ष्म ज्ञान हे विश्वबुद्धीशी जोडल्यामुळे होते. सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे मन विश्वमनाशी आणि बुद्धी विश्वबुद्धीशी जोडलेली असल्यामुळे त्यांना सूक्ष्म परीक्षण करता येते अन् सूक्ष्म ज्ञान मिळवता येते.’’ यावरूनही लक्षात येते की, ‘वर्ष २०१० मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सांगितलेल्या वरील सूत्राविषयी श्री. निषाद यांना काहीही ठाऊक नसतांना त्यांनी संबंधित साधिकेला तिच्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले.’

४. सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विचार आणि सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे विचार यांत साम्य जाणवणे

सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांनी त्यांच्या वाढदिवसापूर्वी ४ दिवस आधी पाठवलेली ज्ञानाची धारिका आवडल्यामुळे त्यांच्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पाठवलेला प्रसाद आमचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भातील वरील बोलणे संपता क्षणी मिळाला. यावरून आमच्या बोलण्यामागील सूक्ष्मातील सूत्रधार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच असून त्यांनी आमच्या बोलण्याला दुजोरा दिल्याचे जाणवले. दोन्ही उदाहरणांतून हे लक्षात येते की, ‘सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे प्रेरणास्रोत अन्य कुणी नसून साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत.’ त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विचार आणि सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे विचार यांत साम्य जाणवते. दोघांच्या विचारांमधील साम्य हे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी अखंड अनुसंधान असल्याचे द्योतक आहे. यावरून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा अमर्यादित आहे. त्यांचे कार्य दिव्यतम आहे आणि त्यांची कीर्ती अपार आहे’, हेच लक्षात येते. ही सर्व त्यांचीच कृपा आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१.५.२०२४)