आसनगाव येथे परिचारिकेची छेड काढणारा अटकेत !

समाजात बोकाळणारी वासनांधता धोकादायक !

प्रतिकात्मक छायाचित्र

आसनगाव (ठाणे) – खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या २१ वर्षीय परिचारिकेची आसनगाव रेल्वेस्थानकात छेड काढणार्‍या नीलेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तिच्या समवेत अश्लील चाळेही केले.