उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वेदिका उगले ही या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. वेदिका तानाजी उगले उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.६.२०२४)
कु. वेदिका तानाजी उगले उन्हाळ्याच्या सुटीत देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आली होती. त्या वेळी साधिकांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. कु. दीपाली राजेंद्र माळी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. ‘वेदिका आनंदी आणि उत्साही असते.
१ आ. तिला सेवा सांगितल्यावर ती तत्परतेने सेवा करत असे.
१ इ. ती सेवा करतांना वेळ वाया घालवत नाही.
१ ई. तिला एखादी सेवा सांगितल्यावर ती त्याच पद्धतीने करत असे.
१ उ. तिला ‘मी सांगितलेल्या सेवा आधीपासूनच येत असाव्यात’, असे मला वाटत होते.
१ ऊ. वेदिकामधील वेगळेपण लक्षात येणे : वेदिकाने मला सांगितले, ‘‘मी घरीही आईला सर्व घरकामांमध्ये साहाय्य करते.’’ त्या वेळी मला वाटले, ‘तिच्या वयाची समाजातील मुले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आणि भ्रमणभाष पहाण्यात अन् मनोरंजक गोष्टी करण्यात वेळ घालवतात; मात्र दैवी बालके स्वतःतील गुणांचा वापर करून सेवा करतात.’ त्या वेळी मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
१ ए. वेदिकाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. ती सेवेत साहाय्य करतांना मला पुष्कळ उत्साह वाटून आनंद मिळत असे आणि हलकेपणा जाणवत असे.
२. तिच्या समवेत असतांना मी निर्विचार स्थिती अनुभवत होते.
३. मला तिच्या समवेत असतांना सतत भावस्थितीत रहाता येत होते, तसेच मला गुरुदेवांचे सतत स्मरण होत होते.
४. तिच्याकडून ‘पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटत होते.’
मला हे सर्व केवळ गुरुदेवांमुळेच अनुभवता आले आणि त्यातील आनंद घेता आला. गुरुदेवांप्रती कोटीशः कृतज्ञता !’
२. सौ. विमल गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२ अ. केवळ २ दिवसांतच सर्वांशी जवळीक साधणे : ‘वेदिका मला सेवेत तिला जमेल तेवढे साहाय्य करत होती. तेव्हा आम्ही सगळेच तिच्यासाठी नवीन होतो, तरीही तिने २ दिवसांतच सर्वांशी जवळीक साधून सर्वांना आपलेसे करून घेतले. ‘तिची आणि आमची पुष्कळ आधीपासूनची ओळख आहे’, असे मला जाणवले.
२ आ. जाणवलेले पालट
१. साधिकांनी तिच्या आईला विचारले, ‘‘वेदिका घरीही काम करते का ?’’ तेव्हा तिची आई म्हणाली, ‘‘ती घरीही काम करते; मात्र आश्रमात आल्यापासून तिची सेवा करण्याची तळमळ वाढली आहे. मलाही आश्चर्य वाटत आहे.’’
२. वेदिका आश्रमात आल्यावर आश्रमातील चैतन्यामुळे ३ – ४ दिवसांतच तिच्या वागण्या-बोलण्यात पालट जाणवला. ‘तिच्यातील उत्साह वाढला’, असे मला जाणवले.
३. एकदा एका काकूंनी तिला सांगितले, ‘‘ताटात अतिरिक्त पदार्थ घेऊन वाया घालवू नयेत.’’ तेव्हा वेदिका दुसर्या दिवसापासून ताटात थोडेच वाढून घेत होती आणि ते संपल्यावर आवश्यक तेवढेच घेत होती. तिने स्वतःत लगेच पालट केला. तेव्हा मला तिच्यातील स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ शिकायला मिळाली.
२ इ. ‘तिच्यात अहं अल्प आहे आणि तिची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे मला वाटते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १३.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |