मुंबई – दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई या ४ मतदारसंघांत मुसलमानांच्या मताधिक्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला. मुसलमानांच्या मताधिक्यामुळे मुंबईतील ४ जागांवर विराधी पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. मुंबईतील ६ जागांपैकी महायुतीला केवळ २, तर महाविकास आघाडीचे ४ उमेदवार निवडून आले.
१. दक्षिण-मध्य मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांना मुसलमानबहुल असलेल्या अणुशक्तीनगरमध्ये २९ सहस्र, तर शीव-कोळीवाडा मतदारसंघामध्ये ९ सहस्र ३१२ मताधिक्य मिळाले.
२. मुंबई दक्षिण मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांना मुसलमानबहुल मुंबादेवीतून ४० सहस्र, तर भायखळा येथून ४६ सहस्र मतांची आघाडी मिळाली. अरविंद सावंत ५३ सहस्र मतांनी विजयी झाले.
३. मुंबई ईशान्य मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मुलुंड, घाटकोपर पश्चिम या गुजरातीबहुल भागांत मताधिक्य मिळाले, तर मानखुर्द-शिवाजीनगर या मुसलमानबहुल भागात संजय दिना पाटील यांना ८७ सहस्र ९७१ इतके मताधिक्य मिळाले. येथे संजय दिना पाटील यांचा २९ सहस्र ८६१ मतांनी विजय झाला.
४. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ५८ सहस्र इतके मताधिक्य, तर काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना कुर्ला, चांदिवली, वांद्रे (पूर्व), कलिना या मुसलमानबहुल भागांत ७४ सहस्र मताधिक्य मिळाले.