पुणे येथे मुख्याधिकार्‍यांच्या नावाने लाच घेतांना कंत्राटी कर्मचार्‍यास अटक !

२ लाख ७० सहस्र रुपये घेतांना अटक

पुणे – ‘महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास मंडळा’च्या (म्हाडाच्या) योजनेतील सदनिका फेरवितरण पद्धतीने मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार ‘सदनिका मिळवून देतो’, असे सांगत मुख्याधिकार्‍यांच्या नावाचा वापर करून २ लाख ७० सहस्र रुपये लाच स्वीकारतांना अभिजीत जिचकार या कंत्राटी कर्मचार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई पुणे रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलच्या परिसरात करण्यात आली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ६० वर्षीय तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने तक्रार प्रविष्ट केली होती.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारे लाच घेण्याची प्रकरणे चालू रहात असतील, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?