क्षुल्लक कारणावरून पत्नी आणि मुलगा यांच्यावर चाकूने आक्रमण !

संयमाअभावी लोकांमध्ये हिंसक वृत्ती वाढत असल्याचे दर्शवणार्‍या घटना !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – वाढदिवसाचा केक विलंबाने आणल्यामुळे झालेल्या वादातून साकीनाका येथे ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि मुलगा यांच्यावर चाकूने आक्रमण केले. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी राजेंद्र शिंदे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. घायाळ पत्नी आणि मुलगा यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका 

क्षुल्लक कारणावरून पत्नीवर आक्रमण करण्याच्या घटना घडणे, हे संवेदनशीलता संपल्याचे द्योतक !