संतांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. अंजली सतनालकर (वय १९ वर्षे) !

‘वैशाख कृष्ण त्रयोदशी (४.६.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या कु. अंजली सतनालकर यांचा १९ वा वाढदिवस आहे. गुरुदेवांच्या कृपेने मला अंजलीताईकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. अंजली सतनालकर यांना १९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. अंजली सतनालकर

१. शिकण्याची वृत्ती

अंजलीताई सतत शिकण्याच्या स्थितीत असते. ती अनावश्यक बोलत नाही. ताई शिकण्याच्या दृष्टीने आणि साधनेत साहाय्य होईल, अशा पद्धतीने सूत्रे विचारते.

२. इतरांचा विचार करणे

कु. पूनम चौधरी

ती स्वयंपाकघरात दायित्व घेऊन सेवा करते. सहसाधिकेची प्रकृती ठीक नसेल किंवा तिला काही त्रास होत असेल, तर अंजलीताई साधिकेला विश्रांती घ्यायला सांगते आणि स्वत: सेवा पूर्ण करते. कधी कधी अंजलीताईलाही थकायला होते; पण ती इतरांचा विचार करून सेवा करत रहाते.

३. इतरांना साहाय्य करणे

माझी प्रकृती ठीक नसल्याने माझे वैयक्तिक आवरणे, मला मर्दन इत्यादी करणे, यात अंजलीताई मागील ८ मासांपासून मला साहाय्य करत आहे. ती स्वयंपाकघरातील सेवा समयमर्यादेत पूर्ण करून तिच्या विश्रांतीच्या वेळेत मला मर्दन इत्यादी करते. तिला कधी दमल्यासारखे वाटत असले, तर ‘मला मर्दन इत्यादी करू नको’, असे मी तिला सांगते. तेव्हा ती मला म्हणते, ‘‘गुरुदेव माझ्याकडून सेवा करून घेतील. तुला मर्दन केले नाही, तर तुझे त्रास वाढतील.’’

४. भाव

तिच्या मनात उत्तरदायी साधकांच्या प्रती भाव आहे. तिचा ‘पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत, वय ४६ वर्षे) साक्षात् अन्नपूर्णामाता आहेत’, असा भाव आहे.

५. जाणवलेला पालट

ताई आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर आरंभी तिला आई-वडिलांची आठवण येऊन ती भावनाशील होत असे; मात्र आता ती आई-वडिलांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करते.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला ताईमधील गुण शिकण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या पावन चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक