परिपूर्ण सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. ज्योती सुदिन ढवळीकर !

६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती ढवळीकर यांची त्यांच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या जाऊबाई सौ. लता ढवळीकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. ज्योती सुदिन ढवळीकर

१. ‘सौ. ज्योतीताई त्यांना मिळालेली आश्रमातील किंवा प्रसारातील प्रत्येक सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि तळमळीने करतात.

सौ. लता दीपक ढवळीकर

२. सेवेत छोटी चूक झाली, तरी त्यांना त्याची पुष्कळ खंत वाटते.

३. सेवेविषयी ज्या सूचना असतात, त्याविषयी त्या माझ्यापेक्षा अधिक सतर्क असतात.

४. ज्योतीताई मला सेवेला जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात.

५. सेवा करतांना मला काही अडचण आली, तर त्या मला ‘योग्य काय किंवा अयोग्य काय ?’, याविषयी मार्गदर्शन करतात आणि त्यातील काही सूत्रे पुढे उत्तरदायी साधकांना सांगायला सांगतात.’

– सौ. लता दीपक ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६४ वर्षे), बांदिवडे, फोंडा, गोवा. (९.२.२०२४)