पुणे येथे ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या अजय शेळके याला मरेपर्यंत जन्मठेप !

 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या अजय शेळके याला मरेपर्यंत जन्मठेप आणि ६५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस्.पी. पोंक्षे यांनी सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला भरपाई स्वरूपात देण्यात यावी, असेही निकालामध्ये नमूद करण्यात आले आहे. अजय शेळके हा ९ वर्षांच्या मुलीवर ६ महिन्यांपासून अत्याचार करत होता. पीडितेने घटना आईला सांगितल्यानंतर १९ जुलै २०२१ या दिवशी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.