‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ !

‘मी काही कालावधीसाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेत होते. तेव्हा त्यांचा मुलगा श्री. सोहम् सिंगबाळ यांच्याशी माझा काही सेवेनिमित्त संपर्क आला. वैशाख कृष्ण अष्टमी (३१.५.२०२४) या दिवशी श्री. सोहम् यांचा २७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. सोहम् सिंगबाळ
श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ यांना २७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. शांत, स्थिर आणि नम्र

‘श्री. सोहम् यांना मी कधीच अस्थिर झालेले पाहिले नाही. ते कुणाशीही बोलतांना नेहमी शांतपणे आणि नम्रपणे बोलतात.

२. शिकण्याची वृत्ती

कु. मानसी अग्निहोत्री

रात्री भोजनकक्षात आल्यावर ते फलकावरील सर्व चुका लक्षपूर्वक वाचतात. यातून त्यांची शिकण्याची वृत्ती लक्षात येते.

३. इतरांना साहाय्य करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सेवेत जी साधिका असते, त्या साधिकेला सोहम् दादा महाप्रसादाचे ताट आणि अन्य भांडी स्वयंपाकघरात न्यायला साहाय्य करतात. यांतून त्यांचा ‘इतरांना साहाय्य करणे’ हा गुण माझ्या लक्षात आला.

४. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणे

सोहम् दादा रात्री स्वयंपाकघरात जातात, तेव्हा तिथे कुणीच नसते. एखादी ‘ट्रॉली’ किंवा खिडकी उघडी राहिली असेल, तर ते ती बंद करतात आणि ‘अजून काही राहिले नाही ना ?’, असे सर्वत्र बघतात. तिथे पाणी सांडले असेल, तर सोहम् ते पाणी पुसून घेतात. पाणी सांडलेले दिसल्यावर लादी पुसण्याचे कापड मिळाले नाही, तरी सोहम् ते सूत्र सोडून न देता त्यांच्या समवेत असलेल्या साधिकेला किंवा तिथे कुणी आल्यास त्यांना ते सूत्र सांगतात.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे श्री. सोहम् यांनी प्रार्थना करूनच दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे

सोहम् नियमितपणे सायंकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेतल्यावर आधी ते प्रार्थना करतात आणि नंतरच वाचायला आरंभ करतात. यातून ‘गुरुदेवांनी सांगितलेल्या प्रत्येक सूत्राचे ते पालन करतात’, असे माझ्या लक्षात आले. मीही नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करते; परंतु माझ्याकडून वाचन करण्यापूर्वी प्रार्थना होत नाही. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करण्यापूर्वी प्रार्थना केली पाहिजे’, हे सूत्र मला त्यांच्याकडून शिकता आले.

‘मला सोहम् यांचे काही गुण शिकता आले’, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि हे गुण माझ्यामध्ये येण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते.’

– कु. मानसी विनोद अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२४)