आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

पुण्यातही गुन्हा नोंद !

महाड – शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात, तसेच पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाड येथील संदेश साळवी यांनी आव्हाड यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. यासह जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आव्हाड यांच्यासह २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे येथेही आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. भीमराव बबन साठे  यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. साठे हे भाजपच्या पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत.