बनावट आधारकार्ड, पारपत्र जप्त
पिंपरी (जिल्हा पुणे) – येथून पोलिसांनी ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पारपत्र, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला सापडला. भोसरी येथील शांतीनगरमध्ये २५ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बांगलादेशी घुसखोरांवर यापूर्वीही कारवाई झाली होती.
१. शामीम राणा, सम्राट अधिकारी, जलील शेख, वसीम मंडल, आझाद शेख अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत.
२. न्यायालयाने त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणार्या इतर संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अंमलदार सुयोग लांडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
३. घुसखोरांमधील काहींनी बंगालमध्ये बनावट कागदपत्रे बनवली. एका बांगलादेशीने पुण्यात बनावट कागदपत्रे बनवली, तर एक घुसखोर इतर राज्यांत काही वर्ष राहिल्यानंतर भोसरी येथे वास्तव्यासाठी आला होता.
४. अटक केलेले पाचही घुसखोर हे भोसरी येथील ‘ओम क्रिएटिव्ह टेलर्स’ या आस्थापनामध्ये काम करत होते. त्यांनी भारतीय बनावट कागदपत्रांचा वापर करून ‘सीम कार्ड’ मिळवले, तसेच ११ सहस्र रुपये मूल्याचा भ्रमणभाष घेतल्याचे पोलीस तपासातून समोर आले. (संबंधितांना ज्यांनी साहाय्य केले, त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. – संपादक)
संपादकीय भूमिका
|