काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची साम्यवादी मानसिकता जाणा !

काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी ‘माझी आजी, वडील आणि आई यांच्या कारकीर्दीतही संपूर्ण व्यवस्था मागासवर्गियांच्या विरुद्ध होती’, असे उद्गार नुकतेच काढले, ते थेट सांस्कृतिक मार्क्सवादाच्या किंवा ‘वोकिझम’च्या पाठ्यपुस्तकातील आहेत. (‘वोकिझम’ म्हणजे सामाजिक आणि राजकीय अन्याय यांविषयी संवेदनशील असलेल्या लोकांचे वर्तन अन् वृत्ती. जगभरातील प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती, कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी नवी संस्कृती उदयास आली ती म्हणजे वोकिझम !) ‘वोकिझम’चा संपूर्ण पगडा असलेल्या अमेरिकेत शाळेतील लहान मुलांना ‘जातीयवादाचे संस्कार तुमच्यावर आईवडीलच करतात; म्हणून तुम्ही आईवडिलांशी संपर्क तोडून टाकायला हवेत’, अशी शिकवण दिली जाते. बाळ राहुलचे वक्तव्य हा या शिकवणीचाच परिपाक आहे.

श्री. अभिजित जोग

ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मातही ‘तुमचे कुटुंबीय जर ख्रिस्ती किंवा मुसलमान नसतील, तर ते तुमच्या जवळचे नाहीत. आपला धर्म मानणारे लोक हेच खरे आपले कुटुंब’, अशी शिकवण दिली जाते. याविषयी या धर्मांचे मार्क्सवादाशी असलेले साम्य विलक्षण आहे. याचा अर्थ ‘संपूर्ण जगावर स्वतःचेच प्रभुत्व असले पाहिजे’, ही निरंकुशतावादी विचारसरणी असणार्‍या सगळ्या शक्तींची हीच शिकवण असते.

‘आम्ही जातीआधारित जनगणना करून समाजाचा ‘सोशिओ-इकॉनॉमिक एक्स-रे’ (सामाजिक आर्थिक विषमता दूर करण्यासाठी संशोधन) काढू आणि नंतर क्रांती चालू होईल’, ‘समाजातील संपत्तीचे पुनर्वाटप केले पाहिजे’, यांसारखी राहुल गांधींची नुकतीच सर्व वक्तव्ये ते सांस्कृतिक मार्क्सवादाच्या संपूर्ण प्रभावाखाली असल्याचेच दर्शवतात.

समता, सामाजिक न्याय अशा आकर्षक मुखवट्यांच्या आड समाजात अधिकाधिक संघर्ष भडकावून अराजक आणि विध्वंस यांचे तांडव चालू करण्याची ही भयानक योजना आहे. ‘माझे आई-वडील, आजी यांच्या काळातही व्यवस्था मागासवर्गियांच्या विरुद्धच होती’, याचा अर्थ ‘संपूर्ण व्यवस्था नष्ट केल्याखेरीज न्याय मिळणार नाही’, असाच आहे. ‘जागतिक व्यवस्था आणि मानवी सभ्यता नष्ट करून त्याजागी आम्ही नवा मानव आिण नवा समाज निर्माण करू’, असा मार्क्सवाद्यांचा दावा असला, तरी असे काही करण्याची कुठलीही क्षमता त्यांनी आजवर दाखवलेली नाही. त्यांच्या विचारातून आजवर रक्तपात, कत्तली आणि विध्वंस यांखेरीज काहीही निष्पन्न झालेले नाही. या अराजकतावादी लोकांना भारताने खड्यासारखे बाजूला ठेवायला हवे.

– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डाव्यांची वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे. (२३.५.२०२४)