व्यवसाय चांगला चालत असतांनाही तो बंद करून पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. सुचिता काशेट्टीवार (वय ६१ वर्षे) !

१. साधना कळल्यावर त्वरित साधनेचे प्रयत्न करणे

सौ. सुचिता काशेट्टीवार

‘सर्वप्रथम माझे सासरे श्री. सुरेश काशेट्टीवारकाका (नाना, वय ६९ वर्षे) यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. काही दिवसांतच त्यांची पत्नी सौ. सुचिता काशेट्टीवार (वय ६१ वर्षे) यांनाही साधनेची ओढ लागली आणि त्वरित त्यांनी साधनेचे प्रयत्न चालू केले, उदा. व्यष्टी साधना करणे, केंद्रात नियमित आढावा देणे, ‘ऑनलाईन’ सत्संगात बोलणे, ‘साधनेचे कोणते प्रयत्न आणि ते कसे करावे ? हे विचारून घेणे. त्यांच्या घरी गृहउद्योग असल्याने घरातील कामे आणि व्यवसायातील कामे यांमुळे त्या अतिशय व्यस्त असत. त्यामध्येही कुठेही सवलत न घेता त्यांची नियमित व्यष्टी साधना चालू असायची.

श्री. सुरेश काशेट्टीवार

२. यजमान पूर्णवेळ साधना करत असल्याने एकटीवर व्यवसायाचे दायित्व असूनही ते सांभाळून साधना करणे आणि पुढे व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करणे

श्री. कृष्णा ऐय्या

नाना (श्री. सुरेश काशेट्टीवार) पूर्णवेळ झाल्यापासून सौ. काशेट्टीवार यांनाही पूर्णवेळ साधनेची ओढ लागली अन् त्यासाठी त्यांनी प्रयत्नही पुष्कळ केले. त्यामुळे घरातील चालू असलेल्या व्यवसायाचे दायित्व काकूंवर आले. तरीही ते पूर्ण करून, व्यष्टीचे प्रयत्न करून, व्यवसायातूनही त्या लवकर बाहेर पडल्या आणि उद्योगही बंद केला. व्यवसाय चांगला चालत असतांनाही त्यांनी तो पूर्णपणे बंद केला. त्यांचे नातेवाईक पुष्कळ आहेत अन् मोठे व्यावसायिक आहेत, तरीही त्यांनी त्यांना साधनेच्या स्तरावर उत्तरे देऊन निरुत्तर केले. मला अजूनही आश्चर्य वाटते की, त्यांनी साधनेला आरंभ केला आणि त्वरित पूर्णवेळ साधना करू लागल्या. प्रक्रिया पूर्ण करत असतांना आश्रमातील कार्यपद्धत आणि अन्य प्रयत्न त्यांनी स्वीकारले अन् स्थिर आणि आनंदी राहू लागल्या.’

– श्री. कृष्णा आय्या (सौ. सुचिता काशेट्टीवार यांचे जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२३)