लांजा, रत्नागिरी येथील नम्र आणि तळमळीने सेवा करणारे श्री. नीलेश अच्युत जोशी आणि हसतमुख अन् शिकण्याची वृत्ती असलेल्या सौ. प्रीती नीलेश जोशी !

वैशाख शुक्ल त्रयोदशी (२१.५.२०२४) या दिवशी श्री. नीलेश आणि सौ. प्रीती जोशी यांच्या लग्नाचा १९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आणि त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. नीलेश जोशी आणि सौ. प्रीती जोशी

श्री. नीलेश आणि सौ. प्रीती जोशी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. श्री. नीलेश अच्युत जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. सौ. प्रीती नीलेश जोशी (पत्नी), लांजा, रत्नागिरी

१ अ १. पत्नीला साधनेत साहाय्य करणे : ‘आमचा विवाह झाल्यावर मला सनातन संस्थेच्या कार्याची ओळख झाली आणि मला खर्‍या अर्थाने साधना समजली. मला लहानपणापासून भक्तीमार्गाची आवड होती; पण खरा आनंद ‘हा सत्सेवा आणि साधना करण्यात आहे’, हे श्री. नीलेश यांनी मला योग्य प्रकारे समजावून सांगितले. आरंभी ते मला त्यांच्या समवेत दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, नामदिंडी, गुरुपौर्णिमा, या सेवांसाठी घेऊन जात असत. त्या वेळी ते मला सांगत, ‘‘तुला आता सेवेतील आनंद कसा असतो ?’, हे लक्षात येईल’’ आणि तसेच झाले. मला सेवेतील आनंद अनुभवता आला.

१ अ २. आज्ञापालन करणे : यजमान उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करतात. ते सेवेतील कोणताही निर्णय स्वतःच्या मनाने घेत नाहीत. ते मिळालेली प्रत्येक सेवा आज्ञापालन म्हणून करतात. त्यांच्या मनात सेवा करतांना कोणतेही अनावश्यक प्रश्न नसतात.

१ अ ३. नम्रता : ते लहान मुलांशी प्रेमाने आणि मोठ्या व्यक्तींशी आदराने बोलतात. ते घरात किंवा बाहेर कधीच मोठ्या आवाजात बोलत नाहीत.

१ अ ४. शिकण्याची वृत्ती : ते नेहमीच नाविन्यपूर्ण सेवा, तसेच सेवेतील बारकावे शिकण्याचा प्रयत्न करतात.

१ अ ५. इतरांचा विचार करणे : त्यांचा ‘आपण कुणाला दुखवत नाही ना ?’, असा नेहमी विचार असतो. ते नेहमी ‘आपल्याकडून इतरांना साहाय्य कसे होईल ?’, याचा विचार करतात.

१ अ ६. त्यागी वृत्ती : ते ‘मिळालेला प्रत्येक क्षण गुरुसेवेसाठी आणि मिळालेले धन गुरुकार्यासाठी वापरले पाहिजे’, असे सांगतात. ते वैयक्तिक कारणांसाठी किंवा अनावश्यक व्यय करत नाहीत.

१ अ ७. व्यवहार प्रामाणिकपणाने करणे आणि व्यवसायात फसवणूक झाल्यावर गुरूंप्रतीच्या श्रद्धेमुळे न डगमगणे : श्री. नीलेश अभियंता असून त्यांनी १२ वर्षे बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये उच्च पदावर नोकरी केली आणि नंतर ८ वर्षे व्यवसाय केला. त्यांनी भागीदारीत व्यवसाय केला. ते व्यवसायात यशाच्या शिखरावर असतांनाही त्यांनी कधीच वाममार्गाने पैसे कमावणे किंवा फसवणे, असे केले नाही. ते व्यवसायानिमित्त विदेशात असतांना त्यांनी गुरूंना अप्रिय असे कृत्य केले नाही. त्यांनी काही प्रसंगी विदेशात केवळ फळे खाऊन किंवा उपाशी राहून दिवस काढले; पण कधीच तेथील असात्त्विक आहार घेतला नाही. यशस्वी उद्योजक होऊनही ते कधीही कुणाशीही अहंकाराने वागले नाहीत. वर्ष २०२१ मध्ये त्यांनी व्यवसायातील भागीदारी सोडतांना त्यांच्या भागीदाराने त्यांची आर्थिक फसवणूक केली; मात्र गुरूंवरील अपार श्रद्धेमुळे ते कधीच डगमगले नाहीत. ते आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सनदशीर मार्गाने न्यायालयीन लढा देत आहेत.

१ अ ८. स्वीकारण्याची वृत्ती : काही मासांपूर्वी त्यांना अधून-मधून ‘फेसबुक’ पहायची सवय लागली होती. त्याविषयी मृणालने (मुलीने) त्यांना एक दिवस जाणीव दिल्यावर त्यांनी तसे करणे सोडून दिले.

१ अ ९. सेवेची तळमळ : ते नेहमीच सेवेला प्राधान्य देतात. ‘मिळालेली सेवा बिनचूक कशी होईल आणि त्यातून साधना कशी होईल ?’, यांकडे त्यांचे लक्ष असते.’

कु. ऋग्वेद नीलेश जोशी आणि कु. मृणाल नीलेश जोशी

१ आ. कु. ऋग्वेद नीलेश जोशी (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), लांजा, रत्नागिरी

१. ‘आमच्या आजीच्या (आमच्या बाबांच्या आईच्या) आजारपणाच्या कालावधीत बाबांना पुष्कळ वेळा झोपायला उशीर होत असे, तरीही ते सेवा पूर्ण करूनच झोपत असत.

२. बाबांनी आजीची सेवा संतसेवा म्हणून केली. ते मध्यरात्री उठून ‘आजी व्यवस्थित झोपली आहे ना ’, असे प्रतिदिन बघत असत. आधुनिक वैद्यांनी बाबांचे अनेक वेळा कौतुक केले.’

१ इ. कु. मृणाल नीलेश जोशी (मुलगी, आध्यात्मिक पातळी ५४ टक्के, वय ११ वर्षे), लांजा, रत्नागिरी

१. ‘बाबा मला नेहमी व्यष्टी साधना करण्याची जाणीव करून देतात.’

२. सौ. प्रीती नीलेश जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. श्री. नीलेश अच्युत जोशी (सौ. प्रीती यांचे यजमान), लांजा, रत्नागिरी

२ अ १. शिकण्याची वृत्ती : ‘प्रीती सतत वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते. ती दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवायला शिकली. तिने अनेक पुस्तके वाचून वेगवेगळ्या विषयांवरची माहिती (मुलांसाठी उपयुक्त, व्यक्तीमत्त्व विकासासाठी उपयुक्त, साधनेसाठी उपयुक्त) मिळवली. तिने सनातनचे विविध ग्रंथ वाचून साधना शिकून घेतली आणि स्वतःचे शंकानिरसन करून घेतले. मोठा मुलगा ऋग्वेद आठव्या मासात जन्माला आहे. आधुनिक वैद्य त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीबद्दल साशंक होते. तिने लहान ‘मुलांचे मानसशास्त्र’ (Post Graduate Diploma in Child Psychology) हा अभ्यासक्रम पूर्ण करून ‘मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय करायचे ?’, याविषयी शिकून घेतले.

२ अ २. शिस्तप्रिय : ती दैनंदिन जीवनातील सर्व कामे वेळच्या वेळी करते.

२ अ ३. लढाऊ वृत्ती : मे २०१५ मध्ये नेपाळ येथील भूकंपग्रस्तांच्या साहाय्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे साहाय्य पथक गेले होते. प्रीती त्या पथकासह नेपाळ येथे गेली होती. ती नेपाळमधील आपत्कालीन परिस्थितीला धीटपणे सामोरी गेली. ‘२ वर्षांच्या मृणालने (मुलीने) आठवण काढून रडू नये’, यासाठी त्या कालावधीत प्रीतीने घरी संपर्क केला नाही. एकदा एका दारू प्यायलेल्या माणसाने आमच्या चारचाकी गाडीला धडक दिली होती. त्या वेळी पोलीस ‘कुणाची चूक आहे हे न पहाता’, आमच्याशी अरेरावीने बोलत होते. त्या वेळी प्रीतीने धीटपणे आणि लढाऊ वृत्तीने पोलिसांची अरेरावीची भाषा थांबवली.

२ अ ४. कठीण परिस्थितीला धिराने सामोरे जाणे : आमच्या विवाहाला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत आमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक बरे-वाईट प्रसंग आले. सौ. प्रीती या प्रसंगात नेहमीच खंबीरपणे माझ्या समवेत होती.

२ अ ५. गुरु आणि संत यांच्याप्रती श्रद्धा : वर्ष २०२० मध्ये आम्ही पुणे येथून लांजा येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. मी माझा व्यवसाय सोडून साधनेसाठी अधिकाधिक वेळ द्यायचा निर्णय घेतला. या दोन्ही निर्णयांमध्ये प्रीतीची गुरुदेवांवरील श्रद्धा जाणवली. तिच्या मनामध्ये सनातनच्या सर्वच संतांविषयी श्रद्धा आहे.’

२ आ. कु. ऋग्वेद नीलेश जोशी (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) लांजा, रत्नागिरी

२ आ १. हसतमुख : ‘आई घरातील कामांमुळे उशिरा झोपते, तरीही ती सकाळी ५ वाजता उठते. ती हसतमुख असते.

२ आ २. धर्माभिमान : माझ्या महाविद्यालयात अन्य पंथीय विद्यार्थ्यांकडून नमाजपठणाचा प्रकार घडला होता. ते आईला कळताच तिने आमच्या प्राध्यापकांना त्याची जाणीव करून दिली. दुसर्‍या दिवसापासून विद्यार्थ्यांकडून नमाजपठण करणे बंद झाले.

२ आ ३. सेवेची तळमळ : आजीच्या आजारपणाच्या काळात आईची व्यस्तता असूनही ती घरून भ्रमणभाषवरून जिज्ञासूंना संपर्क करणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे इत्यादी सेवा करत होती.’

२ इ. कु. मृणाल नीलेश जोशी (मुलगी आध्यात्मिक पातळी ५४ टक्के, वय ११ वर्षे) लांजा, जिल्हा रत्नागिरी.

२ इ १. मुलांवर साधना आणि सेवा यांचे संस्कार करणे : ‘आई सेवेला जातांना मलाही समवेत नेते. त्यामुळे मलाही सेवा करण्याची संधी मिळते. आई मला प्रतिदिन सारणी लिखाण करण्याची आणि व्यष्टी साधनेच्या आढावा देण्याची आठवण करून देते.’

(लेखातील सर्व सूत्राचा दिनांक : १८.४.२०२४)