उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कश्यपी तांबे ही या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. कश्यपी मकरंद तांबे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. सौ. मुक्ती मकरंद तांबे (कु. कश्यपीची आई), उत्कर्ष नगर, पिंगुळी, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. आम्ही वालावल येथे रामनवमी उत्सवासाठी गेलो होतो. तेथे ‘सनातन संस्थे’तर्फे सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावले होते. त्या ठिकाणी कु. कश्यपी मला ओढत घेऊन गेली.
१ आ. देवाची आवड : कु. कश्यपीची भगवंतावर पुष्कळ श्रद्धा आहे. ती एकटी खेळत असतांना देवाशी बोलत असते. ती श्लोक पुष्कळ श्रद्धेने म्हणते आणि नामजप भावपूर्ण करते. तिला देवतांच्या गोष्टी ऐकायला आणि सांगायला आवडतात.
१ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव : एकदा कु. कश्यपी आणि मी चालत जात होतो. तेव्हा तिची दृष्टी मार्गाच्या कडेला पडलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’वर गेली. ते दैनिक पाहून ती मला म्हणाली, ‘‘आई, हे बाप्पाबाबांचे (परात्पर गुरु डॉ. अाठवले यांचे) दैनिक आहे. असे चिखलात कुणी टाकले ? आपण ते घेऊन जाऊया.’’ तेव्हा मी ते दैनिक उचलले आणि त्याचे अग्नीत विसर्जन केले.
१ ई. साधनेचे प्रयत्न : कश्यपी वहीत चुका लिहिते आणि चुकांवर स्वतःहून प्रायश्चित्त घेते.
१ उ. चुकांविषयी गांभीर्य : कश्यपीला चुका लक्षात आणून दिल्यावर ती लगेच त्या स्वीकारते. ती तिच्याकडून झालेली चूक स्वतःहून सांगते. शाळेत तिच्याकडून झालेल्या चुकाही ती घरी येऊन मला सांगते.’
१ ऊ. स्वभावदोष : हट्टीपणा, सांगितलेले लगेच न ऐकणे, चिडचिड करणे आणि मोठ्याने बोलणे’
२. श्रीमती ज्योती आनंद चौधरी (कु. कश्यपीची आजी (आईची आई), वालावल, जिल्हा सिंधुदुर्ग.
अ. ‘कु. कश्यपीच्या बोलण्यात पुष्कळ गोडवा आहे. तिच्या बोलण्यातील गोडवा ऐकून ‘तिने बोलतच रहावे’, असे मला वाटते.’
३. कु. गीता चौधरी (कु. कश्यपीची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘कु. कश्यपी खेळतांना इतर मुलांच्या समवेत कधीच भांडत नाही. ती इतर मुलांचे गार्हाणे कधीच सांगत नाही, तर ‘त्या वेळी नेमके काय झाले’, हे तत्त्वनिष्ठपणे सांगते.
आ. तिला या वयातही ‘परिस्थितीनुसार कसे वागायचे ?’, हे लक्षात येते, उदा. दळणवळण बंदीच्या काळात तिच्या बाबांना काम नव्हते. तेव्हा तिने खाऊसाठी कधी हट्ट केला नाही. घरात असलेला खाऊ तिने पुरवून खाल्ला.
इ. तिला इतर मुलांसारखे आधुनिक पद्धतीने रहायला आवडत नाही. ती साधी रहाते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ९.१२.२०२३)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या http://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.